*नमस्कार*
अंकुर सामाजिक संस्था गेले ३ वर्षे सातत्याने महिला दिनाचा कार्यक्रम शास्त्रीनगर
येथील सरकारी रुग्णालयात साजरा करत आहे.
८ मार्च जागतिक महिला दिन. आपण 7मार्च ला रात्री १२ नंतर व ८ मार्चला रात्री १२
च्या आत माता नवजात मुलींना जन्म देतील त्या माता व नवजात मुलींचा सन्मान आपण करत
असतो.
स्वरूप :-
एक हजाराचा धनादेश,
नवजात बालिकांना कपडे,
आईला पौष्टीक आहार
अश्या प्रकारचे नियोजन असेल पण नेमका मुली किती जन्माला येतील यांचा अंदाज आपण देऊ
शकत नाही. नक्की किती मुलींचा जन्म झाला हे आपल्याला ९ तारखेला सकाळी समजते.
तेव्हा चला या ४ वर्षाच्या उपक्रमात आपल्याला योगदान करायचे असल्यास संपर्क करा.
अक्षदा भोसले : 8652284888
स्वप्नील भालेकर : 9167004356
जाणता प्रतिष्ठान ची टीम व अध्यक्ष श्री. नितीन चौधरी किती कौतुक करावं तेवढं कमी. वेड्यासारखे काम करतायेत पण कोणत्याही सर्टीफिकेट ची गरज नाही...
आपलं काम अखंड राहावं हाच प्रयत्न असतो... माणगाव चा कार्यक्रम उत्तम झाला पण माझा अंकुर चा सहभाग या उपक्रमात खूप कमी असून ही आज एकटाच मोठा न होता इतरांना मोठा करणारा नितिन खूप धन्यवाद... स्वार्थ भाव कधीही मनात नसणारा जाणता प्रतिष्ठान तुसी ग्रेट हो असच काम करा अभिमान आहे तुमचा... माझ्याकडून यावेळी सहकार्य नाही होऊ शकले पण मी नसांगता अंकुर सामाजिक संस्थेला बरोबर घेऊन मी आपण जो मान दिलात त्याबद्दल धन्यवाद.. नितीन दादुस आभार नाही मानू शकतं पण कधीही आवाज दे मी असेन !
मा. माजी आमदार श्री. नरेंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. संदीप तरे यांनी आश्रमातील मुलांना दुपारच्या जेवणाचे आयोजन केले होते.
तसेच या कार्यक्रमाला संदीप तरे, शक्तिवान भोईर, राजाभाऊ पातकर व अनेक मान्यवरांची उपस्थिती होती मुलांबरोबर मा. आमदार पवार साहेब जेवले आणि खाऊ वाटप केला. खुप खुप धन्यवाद !
०७ ऑक्टोबर २०२०
थोडं कौतुक !
नाहर मल्टीस्पेशालीटी हाॅस्पिटल आणि अंकुर सामाजिक संस्था यांनी सेवाभावनेने केलेल्या कार्याची पोचपावती. माननीय श्री धनंजय मुंडे साहेब मंत्री सामाजिक आणि न्याय व विशेष सहाय्य महाराष्ट्र राज्य यांनी दोन्ही आस्थापनांना शुभेच्छा दिल्या. माननीय मंत्री श्री धनंजय मुंडे साहेब यांचे मनापासून आभार अशीच कौतुकाची थाप पडत राहो.
काल दिनांक २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन डोंबिवली पलावा एक्सपिरिया मॉल येथे ऋणानुबंध व झेड-एड यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक संस्थांचा मेळावा भरवण्यात आला होता.
मेळाव्यात विविध २५ संस्थांबरोबर टिटवाळा येथील अंकुर सामाजिक संस्थेने त्यांचे कार्य मांडले. खूप काही शिकायला मिळालं. नवीन अनुभव, व्यक्तींशी जोडलो गेलो.
माणुसकीचा हात
रौनक आदल्या दिवशी मस्त नाचला खेळला खाल्लं ही व्यवस्थित आणि मस्त झोपला आणि अचानक
पहाटे त्याच्या नाकातून रक्त स्त्रावं आणि तोंडूतन रक्ताची उलटी... मला ही काही
क्षणं कळेना,..
पण डॉ . सोनी ना फोन केला त्यांनी उलटीच औषध द्या सांगितलं आणि नाहीच थांबली उलटी तर ऍडमिट व्हायला लागेल असं सांगितलं.. मग काय त्याला औषध दिल पण साडेचार वर्षाच पिल्लू खूप घाबरलं होतं..मग त्याची समज काढून त्याला झोपवलं.पण तो स्थिर नव्हता.. त्याला काहीतरी होतं होतं पण शब्दात व्यक्त करणं त्याला शक्य नव्हतं.. थोडं मलाही वेगळं वाटलं म्हणून श्रीं. महागणपती हॉस्पिटलचे COO श्री विक्रांत बापट यांना मेसेज केला तर त्यांनी मला सकाळी फोन केला आणि मला सांगितलं आताच्या आता त्याला घेऊन हॉस्पिटल मध्ये घेऊन या... मी ही लगेच त्याला ७ वाजता हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले.. महागणपती हॉस्पिटल मध्ये गेल्या गेल्या पटापट त्याच्यावर ईलाज करण्यात आला आणि त्याला ऍडमिट करण्यात आलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही त्याच्या खर्चाची काळजी करू नका आपलं बाळ बर झालंच पाहिजे.. आणि दोन रात्र त्याला हॉस्पिटल मध्ये त्याला ठेवलं... मग काय आमची ड्युटी चालू झाली... माझी मुलगी भरत आणि आश्रमातली मोठी मुलं आम्ही सगळ्यांनी ४ तास वाटून घेतले आणि रौनक बरोबर हॉस्पिटल मध्ये थांबून त्यांची काळजी घेतली .. आणि काल त्याला संध्याकाळी त्याला घरी सोडल... खूप आभार पूर्ण हॉस्पिटल चे आणि विक्रांत बापट व अभिजित जोशी यांची मी शतशः ऋणी आहे.. आपण हॉस्पिटल बील, मेडिसिनचे बील, ब्लड टेस्ट चे पैसे नघता सर्व इलाज मोफत केला... आपले आभार शब्दात व्यक्त करणं शक्य नाही अंकुर बाल विकास केंद्रची संस्थापिका या नात्याने मी सौ. अक्षदा अभय भोसले आपण माझ्या मुलाला जे सहकार्य आणि आपुलकीची साथ मिळाली ती अशीच मिळत राहो अशी विनंती करते .... आज पुन्हा एकदा गणपती बाप्पा ची प्रचिती आली .. धन्यवाद
युवासेनाप्रमुख तथा राज्याचे पर्यटन, पर्यावरण व राज शिष्टाचार मंत्री मा. ना. श्री. आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने खासदार श्रीकांत शिंदे साहेब,
युवासेना जिल्हा अधिकारी दीपेश म्हात्रे साहेब व शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख राजेश
मोरे, राजेश कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना डोंबिवली शहराच्या वतीने
अंकुर बालविकास केंद्र टिटवाळा मधील गरजू बेघर निराधार मुलांसोबत केक कापून तसेच
त्यांना शालेय वस्तू आणि जीवनावश्यक वस्तू भेट देऊन साजरा करण्यात आला, या प्रसंगी
सागर जेधे शिवसैनिक, युवासेना डोंबिवली शहर युवा अधिकारी सागरजी दुबे, विभाग प्रमुख
किरणजी पाटील, उपविभाग प्रमुख प्रथमेश खरात,उपविभाग प्रमुख स्वप्नील वाणी, उपविभाग
प्रमुख सागर इंगळे, महेश बुट्टे व शिवसैनिक उपस्थित होते.
भविष्यात कोणतीही मदत लागल्यास आम्हाला हक्काने कळवा आम्ही नक्कीच सहकार्य करू असे
सागर जेधे यांनी आश्वासन दिले.. व मुलांशी गप्पा गोष्टी करून आम्ही ही तुमचे उ
भविष्य घडवण्यास नक्कीच प्रामाणिक प्रयत्न करू करू..
खरंच आपलेपणाचे आपुलकीचे 2 शब्द खुप मोलाची मदत करतात..
धन्यवाद
सौ. अक्षदा अभय भोसले
(संस्थापिका )
आपला बाप्पा
अंकुर बाल विकास केंद्र टिटवाळा
दर्शनासाठी नक्की या
आमंत्रक अंकुर चे बालक पत्ता :- अंकुर बाल विकास केंद्र टिटवाळा गोवेली रोड मोरया नगर टिटवाळा पूर्व संपर्क :- 8652284888
आज अंबरनाथ जय हिंद को. ऑ. बँक लि.यांनी धर्मादाय निधी अंतर्गत अंकुर सामाजिक संस्थेला देणगी देऊन पुढील कार्यासाठी एक मदतीचा हात दिला.
यापुढे काही अडचण असल्यास आम्ही आमच्या परीने सहकार्य नक्की करू असा शब्द देऊन अंकुर सामाजिक संस्थेला हक्काचा आधार दिला.. अंबरनाथ जय हिंद को. ऑ. बँक लिमिटेड चे आम्ही शतशः ऋणी आहोत... आज आपण माझ्या कामाची नोंद घेतली आणि मदतीच पाहिलं पाऊल उचलं त्याबद्दल धन्यवाद.
२५ डिसेंबर २०२१ नाताळ,,,, इंडियन मेडिकल असोसिएशन डोंबिवली तर्फे नाताळ निमित्य काही वेळ मुलांबरोबर घालवून मुलांना गिफ्ट्स खाऊ व आश्रमाला लागणाऱ्या वस्तू दिल्या...
सगळ्यात महत्वाचं आणि सांगण्यासारखी गोष्ट कि दुनिया गोल आहे असं म्हणतात त्याची
प्रचिती आली. डॉ उपासणी यांचे इंदिरा हॉस्पिटल आज मोठे डॉ हयात नाही. पण त्यांचा
मुलगा व सून आपल्या आश्रमात आले.. आणि माझा (अक्षदा भोसले ) जन्म ही याच हॉस्पिटल
मधला असल्यामुळे मला ही आणि त्यांनी ही खूप अभिमान वाटला... हे सांगावस वाटलं कारण
जवळ जवळ माझा वैयक्तिक संपर्क नसला तरी आज जवळ जवळ 45 वर्षानंतर ची ओळख जेव्हा डॉ.
नीती मॅम नी सांगितली तेव्हा माझ्या मुलांनाही खूप मज्जा वाटली... एक वेगळाच अनुभव
आला...
डॉ. सुनीत उपासणी म्हणाले अक्षदा इंदिरा हॉस्पिटल मध्ये जन्मलेली प्रत्येक मुलगा
मुलगी आमच्या परिवाराचा सदस्य चं आहे. कधी काही अडचण आली तर नक्की फोन कर आम्ही
नक्कीच मदत करू. सर मॅम असं बोलले आणि खूप छान वाटलं...
खरंच खूप अभिमान वाटला...
45 वर्षानंतर ही ओळख मी डोंबिवलीकर
IMA च्या प्रत्येक डॉ खूप खूप धन्यवाद !!!
अंकुर बाल विकास केंद्रातील मुलांना hepithesis B चे vaccination चे डोस देण्यात आले... हे डोस मा. मा. खुशबू ताई चौधरी यांनी तेरापंथ युवक परिषद डोंबिवली यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले.
तसेच महागणपती हॉस्पिटल टिटवाळा चे COO श्री. विक्रांत बापट सर यांच्या मौल्यवान
सहकार्याने छान पार पाडण्यात आला. अंकुर आश्रमातील मुलांनासाठी नेहमीच महागणपती
हॉस्पिटल मदतीसाठी सज्ज असते याचा अनुभव अनेकदा आला..
तसेच डॉ. अमिशी मॅम याही महागणपती हॉस्पिटल मध्ये कार्यरत असल्याने यांच्या ही
माध्यमातून खूप मोलाची मदत मिळतं असते..
खरंचटिटवाळा चा गणपती बाप्पा ची प्रचिती मला तरी या सर्वांच्या माध्यमातून
मिळाली...
खुशबू ताई, बापट सर, डॉ. अमिशी मॅम आपल्या सर्वांचे आभार नमानता आपल्या ऋणात
राहायला मला नक्की आवडेल...
बाप्पा ची कृपा आम्हावर अशीच राहू दे....
आज 14 नोव्हेंबर बाल दिन अंकुर बाल विकास केंद्र टिटवाळा मध्ये मेरिडियन स्कूल मधली मुलं सकाळी आश्रमात आली आणि मुलांना भेट वस्तू देऊन बाल दिन साजरा केला ..
मेरिडियन स्कूल टिटवाळा , टीचर , सगळ्यांचे आभार
26 डिसेंबर 2022 सोमवार.. एक उत्साहाचा दिवसं.. आतुरता दाटून आली होती... सकाळ पासून नुसती लगबग चालू होती... रविवार पासूनच सोमवारची वाट बघतं होतो सगळेच अगदी मी ही...
कारण 26 डिसेंबर 2022 ला अंकुर बाल विकास केंद्र टिटवाळा येथील मुलांना DOMINOS
मध्ये पिझ्झा खायला जायचं होतं.
मग काय बाहेर जायचं म्हणजे काय कपडे घालू, मी कशी दिसते दिसतो यातचं वेळ गेला आणि 1
वाजता यश (दादा )सिंग आला. त्याच्या बरोबर त्याचे आई बाबा बहीण मावशी असे आले. गाडी
5 सीटर ची होती पण त्याने मुलांना डॉमिनोस मध्ये सोडल आणि मग त्याच्या नातेवायकांना
घेऊन आला.
टिटवाळा च डॉमिनोस आपल्या मुलांनी भरलं... पहिल्यांदा गेल्यावरती त्यांच्या
चेहऱ्यावर कुतूहल होतं. काय करू काय नको असं झालं होतं... काय खायचं माहित नसल्याने
जे त्या दादाने पनीर पिझ्झा मागवला तो मात्र मस्त होता...आज पिझ्झा खायचा आणि बाहेर
जायचं म्हणजे न्यार च ना..
जसे पिझ्झा आले तसे पटापट मुलांनी खायला घेतले.. कुठेच मुलांना कमी खा जास्त खायचं
नाही असं सांगावं लागलं नाही कारण दादाने मुलांना सांगितलं पाहिजे तेवढं खा...
ग्रेट
असं नाही की मुलांनी पिझ्झा कधीच खाल्ला नव्हता. या आधीही अनेकदा पिझ्झा बर्गर खाऊन
झाला पण तिथे बसून खाण ती मज्जा औरच....
कधी कधी अशी चांगल्या विचारांची माणसं पहिली ना की आज ही देवं असल्याचा अनुभव
येतो... तर कधी कधी आमचं जेवण उरलं आहे, श्राद्धाचे लाडू उरले आहेत, देऊ का
किंबहुना थेट मोर्च्यातल जेवण उरलेलं आणून देतात...
आपण आपल्या मुलांना असं जेवण देतो का? का मग माझ्या किंवा इतर आश्रमातल्या मुलांना
का द्यावं असं जेवण... आज आश्रमातली मुलं परिस्थितीने गांजलेली असली तरी
त्यांच्यातही स्वाभिमानाचा अंश असतोच... आणि तीचं स्वाभिमानाची मशाल मला मुलांमध्ये
तेवतं ठेवायची आहेत...
बोलणं आणि करणं यात खूप अंतर असत...
आज यश दादाने निःस्वार्थ मनाने कुठेही तोंड वाकड नकारता मुलांना मनोसक्त खायला देऊन
त्यांच्यातली आपुलकीची माणुसकी दाखवली... पण त्यांना हे माहित नाही त्यांच्या मुळे
मुलांना जो आनंद मिळाला तो त्यांनी शब्दांत नाही पण मनापासून दुवा दिली.
समाजात असं मानाने वागवण्याचे धाडस फार कमी लोक करतात...
खूप मनाला भोवणारी गोष्ट आहे ही म्हणून share केली..
दि. 18 फेब्रुवारी 2023 रोजी अंकुर बाल विकास केंद्र टिटवाळा मधील मुलांना मनाली देशेकर च्या वाढदिवसानिमित्त कोळीवाडा हॉटेल मध्ये मुलांना जेवायला बोलावलं होत .
काल पुन्हा एकदा आश्रमातील मुलांना हॉटेल मध्ये जाऊन जेवण्याचा आनंद घेता आला .
हॉटेल मध्ये गेल्यावर टेबल खुर्चीवर बसण्याची लगबग , मग काचेच्या ग्लास मधून पाणी
पिण्याची धडपड न्यारीच होती .
काचेच्या बाउल्स मध्ये सूप आलं तेव्हातर खूप आनंद झाला होता . मग मनाली ताई आली
तीचा केक कापतांना तीचा हात धरून आपली छोटी पिल्ली तयार होती .. खूप खूप खुश होती
मुलं . तिनेही प्रत्येक मुलांना केक भरवला... मुलांना आवडीचंजेवण एकदम झकास ...
खूप आभारी विजय भाऊ देशेकर व त्यांच्या परिवाराचे त्यांनी मुलांना हॉटेल मध्ये
मुलांना बोलवून हॉटेल चा आस्वाद घेऊन दिला ...
काल मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह होता आनंद हि होता.
मी ऋणी आहे देशेकर परिवाराची.
दि. 15 ऑगस्ट 2024 ला ध्वजारोहण अंकुर बाल विकास केंद्र येथे करण्यात आले. त्यातील काही क्षणचित्रे. .
रक्षाबंधनचा सण साजरा केला. अंकुर सामाजिक संस्थेअंतर्गत अंकुर बाल विकास केंद्र हा प्रकल्प गेली आठ वर्ष चालू आहे.
नुसतं आश्रमात मुलांना ठेवून नाही तर प्रत्येक सणाचे महत्त्व समजण्यासाठी उपक्रम
राबवले जातात व आपुलकीचे नाते काय असते याचाही अनुभव येतो.
हा सण साजरा करताना खूप आनंद आणि मजा उल्हास आणि साजरा केला जातो.. दरवर्षी
रक्षाबंधन हा अंकुर बालविकास केंद्रामधील मुलांमध्ये अशाप्रकारे साजरा केला जातो.
मला भाऊ नाही मला बहीण नाही अशी खंत कुठे नसून आम्ही एकमेकांचे भाऊ- बहीण रेशमच्या
धाग्याने नातं बांधून आमचा प्रवास करत असतो.
गोकुळ अष्टमी 27/08/24 ला आश्रमात दहीहंडी साजरी करण्यात आली..
या मुलांबरोबर प्रत्येक सण अश्याच उत्साहात साजरा केला जातो.. आणि आंनद ही साजरा होतो..