अनेक संथांमध्ये काम केल्यानंतर तिथले चांगले, वाईट अनुभव गाठीशी बांधून आपण सुद्धा एक संस्था उभी करावी. ज्या द्वारे सामाजिक वंचित घटकांना त्यांचे आयुष्य सुखकर करण्याचा प्रयदन करता येईल.” या विचाराने अंकुर सामाजिक संस्थेची स्थापना दिनांक २८ डिसेंबर २०१६ मध्ये करण्यात आली.
सदरहू देणगी ८० जी कलमान्वये आयकरातून सुट आहे.
संस्थेअंतर्गत सुरुवातीला देणगी रूपातील कामे सुरू झाली. समाजकार्याचा पाया हा दानधर्मावर उभा आहे हे आपण सारेच जाणतो. मदतीचे अनेक हात एकत्र जोडून संस्थेच्या माध्यमातून दानोत्तर कामे चालू होती. त्यात गरजूंना अन्नवाटप, कपडे वाटप असे लहान उपक्रम घेतले गेले. तर दुसरीकडे महिला दिनानिमित्त शास्त्रीनगर डोंबिवली येथील सरकारी रुग्णालयात साजरा केला जातो. ७ मार्च रात्री १२ नंतर व ८ मार्च रात्री १२ च्या आत जन्माला आलेल्या नवजात मुली व त्यांच्या माता यांचा सन्मान आपण धनादेश, नवजात बालकांचे कपडे, पौष्टिक आहार याने गेली चार वर्ष करत आहेत.
संस्थेचा एक स्थिर प्रकल्प उभा राहावा या विचाराने अंकुर बालविकास केंद्र १५ ऑगस्ट २०१७ रोजी सुरू झाला. प्रकल्प सुरु करण्याच्या उद्देशाने जवळच्या काही व्यक्तींच्या मदतीने सर्वे करण्यात आला. सर्वेच्या निष्कर्षातून असे लक्षात आले की, अनाथ मुलांपेक्षा समाजातील इत्रत दुर्लक्षित बालकांना अधिक गरज आहे. सर्व्हेच्या माध्यमातून समोर आलेल्या निष्कर्षांच्या आधारे काही उद्दिष्टे आखण्यात आली. त्या उद्दिष्टांना अनुसरून अंकुर बालविकास केंद्र येथे मुंबई उपनगरातील दुर्लक्षित, गरीब, एकपाल्य, निराधार असलेल्या मुलांना सुरक्षा, काळजी, आरोग्य, शिक्षण दिले जाते. ज्या माध्यमातून ही मुले स्व-बळावर आपले पुढील आयुष्य जगू शकतील.
अंकुर सामाजिक संस्था संचालित ‘अंकुर बालविकास केंद्रामध्ये सध्या २८ मुले निवास करतात. संस्थेतर्फे त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय करण्यात येते. परंतु मुलांची सर्वस्वी जबाबदारी पार पाडण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट लागते ती पैसा. समाजातील विविध स्तरावरील दानशूर व्यक्ती संस्थेशी जोडले आहेत. संस्थेला वस्तुरूपी मदत होत असते परंतु गरज असते ती आर्थिक मदतीची. ज्याद्वारे मुलांची शाळेची फी, विद्युत बिल, जागेच भाडे, भाजीपाला, दुधबिल, वैद्यकीय खर्च होत असतात. प्रकल्पाअंतर्गत संस्थेतील एका मुलांचा मासिक खर्च साधारण २,००० रुपयांपर्यंत जातो. हा खर्च योजनेद्वारे व्यक्ती मासिक, वार्षिक स्वरूपात करत असतात.
मुलांच्या वाढीकरिता औपचारिक शिक्षणाप्रमाणे अनौपचारिक शिक्षण सुद्धा तितकेच गरजेचे आहे. त्याकरता अंकुर कला केंद्र स्थापन करण्यात आले. जिथे मुलं त्यांना आवडतील अशा वस्तू तयार करतात. ‘कचऱ्यातून कला’, हस्तकला, चित्रकला, नृत्यकला, गायन इतकेच नव्हे तर कराटे सारखे प्रशिक्षण देखील देण्यात येते.
अंकुरशिक्षा हा नव्यावे स्थापन केलेला प्रकल्प आहे. ज्या द्वारे, लिहिता वाचता न येणाऱ्या परंतु शालेय भागात मोठ्या इयत्तेत असणाऱ्या मुलांचा गट तयार करून त्यांना समान पातळीवर आणण्याचे काम केले जाते. त्यासाठी विविध ऍक्टिव्हिटी घेतल्या जातात. सध्या या गटात सहा मुलांचा समावेश आहे.
शालेय जीवनाप्रमाणे संस्थेतील मुलांना भविष्याकाळात कोणत्याही अडचणींना सामोरे जाता यावे यासाठी गृहज्ञानाचे पाठ घेतले जातात. या प्रकल्पात मुलामुलींमध्ये भेद न करता विविध प्रकारचे गृहज्ञान दिले जाते. दर सोमवारी वयोगटाप्रमाणे मुलांकडून पदार्थ करून घेतले जातात. घरामध्ये केल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे ज्ञान गृहज्ञान प्रकल्पाअंतर्गत दिले जाते.
संस्थेचा लाभार्थी गट हा ०६ ते १६ वयोगटातील आहे. दुर्लक्षित, बेघर, गरजू, एकपाल्य आहे. ज्यांच्यासाठी सुरक्षा, काळजी, शिक्षण, आरोग्य या तत्वांवर काम संस्थेअंतर्गत केले जाते. सदर लाभार्थी गट हा मुंबई व उपनगरातील आहे.
दहावी नंतर मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात पुढील शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देणे. व्यवसाय, उद्योगाचे मार्ग / संधी उपलब्ध करून देणे.
सौ. " अझदा अभय भोसले, डोंबिवली शिक्षण :- १२ वी पास (पण आज या वयात S.Y.BA ची परीक्षा देऊन ग्रेजुएट होण्याचा प्रयत्न करत आहे? पती व एक मुलगा एक मुलगी असा छोटा परीवार (आणि त्यात अंकुर आश्रमातील माझी २७ मुल ). गेली ९ वर्षे सामाजिक कार्यात कार्यरत आहे.
परिवार : अस म्हणतात ना यशस्वी पुरुषापाठी स्त्री असते तर माझ्या पाठी माझे पती असल्याने मी आज समाजात स्वत:च स्थान मिळवू शकले. घरात नुसतच बसण्या पेक्षा समाजासाठी काहीतर कर अस मला माझ्या पतींनी सल्ला दिला सांगितल कि कस करायचं काय करायचं हे तुझं तू शोधायचं आणि करायचं इथूनच माझ्या प्रवासाला सुरुवात झाली. छोटी मोठी काम केली. मग एका महिलांच्या संस्थेत काम केले ते करता करता संसाराचा गाढा होताच त्यात वनवासी कल्याण आश्रमाचे उपक्रम मध्ये सहभागी आले. हे सर्व करताना, आपण जर इतर संस्था ना मदत करू शकतो तर स्वतःचीच संस्था काढून काम करावे असा मनात विचार येताच क्षणी अंकुर सामाजिक संस्था डोंबिवली ची स्थापना केली. जमेल तसे उपक्रम घेण्याचा प्रयत्न चालू ठेवला . फेस बुक व्हाट्स आप च्या मदतीने आर्थिक व वस्तुरूपी अडचण साठी काही मदतीचे हात हाती आले .
उपक्रम :- तलासरी तील गावात ५० कुटुंबांना राशन दिले, विक्रमगड शालेय येथील कर सुड गावाच्या जिल्हा परिषदेतील शाळेत स्वेटर, वस्तूंचे वाटप केले. शहापुर मथील गावात पाटी पेन्सिल देऊन प्रौढ साक्षरता साठी सहकार्य केले. तसेच कोरोनाच्या काळात संस्थेमार्फत कमी दरात बेड उपलब्ध करून दिले व प्लाझ्मा साठी सहकार्य केले कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात भीतीने लोक घाबरत होती अशा रुग्णांना स्वत: भेटून धीर दिला. इतर अनेक कार्य करण्याचा प्रयत्न व्यक्तीगत ही चालूच होता. तेव्हा अस लक्षात आल की रस्त्यावर फ्लॅटफॉर्म वर, अनेक निराधार मुलांना स्वावलंबी बनवण्याची गरज आहे स्वबळावर स्वतःच् अस्तित्व निर्माण कसं करता येईल. या साठी अंकुर बाल विकास केंद्र' 'ची स्थापना केली. शिक्षणा पासून वंचित असलेल्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी शाळेची पायरी चढायला लावली. आश्रमातील प्रत्येक मुलाने शाळेत गेलच पाहीजे. कारण गुरु वीना शिक्षण नाही. आज ६ वर्ष होत आली या प्रवासाला...
मराठी साहित्य मंडळ, हिरकणी पुरस्कार, स्वराज्य सोशल ऑर्गनायझेशन, व इतर अनेकांनी कार्याची दखल घेऊन पुरस्काराने सन्मानित केले.
Total Donations
Events Closed
Happy People
Our Volunteers